Karya Ani Samaj | Work and Society

Marathi
0
9789391948788
समाजातील कामाचे बदलते स्वरूप, कामाचे बदलते प्रकार आपण नीट समजून घेणे आवश्यक आहे. कारण त्यामध्ये समाजाच्या प्रगतीची बीजे दडलेली आहेत. अन्नसंकलन करणारा समाज ते थेट माहितीक्रांती युगातला समाज यांतील टप्पे; त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक जीवनावर झालेला परिणाम या पुस्तकात वाचायला मिळेल. आधुनिक समाजातील उद्योगांच्या वाढत्या कक्षा, बहुराष्ट्रीय कंपन्या यांचे सगळ्या क्षेत्रांवर झालेले परिणाम सदर पुस्तकात अभ्यासता येतील. बहुराष्ट्रीय कंपन्या हा शब्द आपण हल्ली सतत वापरतो. परंतु बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे नक्की काय, त्यांचा कारभार कसा चालतो, या कंपन्यांचे सर्व क्षेत्रात काय परिणाम होतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. औद्योगीकरण झाले आणि समाजशास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासातून नवनवीन सिद्धान्त मांडले. या विविध संकल्पना, त्यांचे अर्थ व ज्या शास्त्रज्ञांनी त्या मांडल्या त्यांच्याविषयी माहिती सदर पुस्तकात दिली आहे. माहिती समाज म्हणजे नेमकं काय, प्रगतीशील समाजाची लक्षणे काय याचे जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर झालेले परिणाम याच्या विचाराची मांडणी तिसर्‍या विभागात केली आहे. सर्वच क्षेत्रांत ‘बदल’ हा अपरिहार्य आहे, परंतु त्याचे चांगले-वाईट दोन्हीही परिणाम असतात. ते या पुस्तकात वाचायला, अभ्यासायला मिळतील. समाजशास्त्र व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांना सदर पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.