Tattvadnyan Va Samajik Sashtre Yatil Sanshodhan-paddhati

Marathi
0
9789391948672
विसाव्या शतकाच्या मध्याला पाश्चिमात्य जगतात आंतरविद्याशाखीय अभ्यासाची लाट विशेषत्वाने उफाळून आली. कालांतराने ही लाट भारतीय ज्ञानक्षेत्रसुद्धा व्यापू लागली. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी संस्था यात अग्रेसर होती...भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय अभ्यासाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील २०१६च्या विद्यापीठ कायद्यात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्षेत्रासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ...याबाबत आपल्याकडची स्थितीसुद्धा बदलत चाललेली आहे. कायदा असो, साहित्य असो, कला असो वा क्रीडा असो, अशा विविध क्षेत्रांना आंतरविद्याशाखीयतेने व्यापून टाकलेले आहे. किंबहुना आंतरविद्याशाखीयता हा आजचा युगधर्म आहे. प्रस्तुत ग्रंथ हा वर उल्लेखिलेल्या युगधर्माचे भान राखणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ सिद्ध करणे हे एक आव्हानात्मक काम होते. ते काम प्रा. मीनल कातर्णीकर व प्रा. लता छत्रे यांनी केलेले असल्याने त्या दोघी अभिनंदनास पात्र आहेत. - डॉ. राजा दीक्षित सुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor), अध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ