Vaiyaktik Khel

Vaiyaktik Khel
Marathi
0
978-9-391-94864-1
वैयक्तिक क्रीडा प्रकार (Individual Games) हे जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी खेळले जाणारे खेळ आहेत. त्यांना ‘लोकमान्यता’, ‘राजमान्यता’ आणि ‘जगन्मान्यता’ असं सर्व काही लाभलं आहे. भारतात प्रादेशिक भाषेत क्रीडा विषयक पुस्तकांची मोठीच उणीव आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित करण्याची जिद्द बाळगून या विषयावरचे साहित्य, छायाचित्रे, त्याशिवाय वैयक्तिक क्रीडा प्रकारांवरील प्रसिद्ध नियतकालिके, वेबसाइटस् यांचा अभ्यास करून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. हे पुस्तक म्हणजे “क्रीडा व शारीरिक शिक्षण” या विषयावरील पाठ्यपुस्तक नाही कारण कोणत्याही विद्यापीठाचा “क्रीडा व शारीरिक शिक्षण” चा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेऊन याची आखणी केलेली नाही. उलट अश्या अभ्यासक्रमासाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ असेच या पुस्तकाचे स्वरूप ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मराठी भाषिक क्रीडारसिक हे पुस्तक संग्रही बाळगतील असा विश्वास वाटतो.