Bhuvarasa Paryatan

Bhuvarasa Paryatan
Marathi
0
978-9-391-94854-2
आपल्यापैकी अनेकांना सामान्यपणे एखाद्या ठिकाणचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, पुरातत्वीय वारसा जाणून घेणे खूप आवडते. मात्र, त्या स्थळाला एक भूशास्त्रीय वारसाही असतो आणि तोही तितकाच उत्कंठावर्धक असतो याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. पृथ्वीवरील पर्वत, सागर किनारा, वाळवंट असे प्रत्येक स्थळ हे एक मोठी भूशास्त्रीय संपदा असून त्याला एक प्रदीर्घ असा भूशास्त्रीय इतिहास असतो. अशी भूरूपे लाखो आणि कोट्यावधी वर्षे जुनी असल्यामुळे त्यांना विशिष्ट असा भूशास्त्रीय वारसा (Heritage) असतो. एखाद्या प्रदेशाचा किंवा स्थळाचा भुवारसा ही संकल्पना प्रत्येकाला निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी आहे. कारण कोणत्याही प्रदेशातील पर्यावरण हे प्रामुख्याने तिथल्या भूदृश्याचाच परिणाम असते. पर्वतीय पर्यावरणावर पर्वताच्या विविध गुणधर्मांचा खूप मोठा परिणाम नेहमीच झालेला दिसतो. त्यामुळे पर्वत, मैदाने, नद्या, समुद्र किनारे, हिमनद्यांचे प्रदेश अशी भूदृश्ये आणि त्यांचा भूशास्त्रीय इतिहास समोर ठेऊन पर्यटन केले तर ते अधिक आनंददायी होते. पर्यटन वृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज आणि मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरण हितैषी आणि पर्यटकांच्या जिज्ञासू वृत्तीचं समाधान करण्यासाठी नवनवीन संकल्पना सध्या पुढे येत आहेत. भूवारसा स्थळ पर्यटन (Geoheritage Tourism) ही त्यातलीच एक आधुनिक संकल्पना. भूवारसा स्थळांच्या अभ्यासात आणि पर्यटनामध्ये मुख्य भर हा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील नैसर्गिक भूरुपे व भू-आकार यांनी बनलेल्या भू-दृष्यावर (Landscape) असते. त्यामुळे अशी ठिकाणे शोधणे व त्यांच्या भूशास्त्रीय क्षमतेचे मूल्यमापन करणे या गोष्टी यात महत्वाच्या ठरतात. भूवारसा पर्यटन या पुस्तकांत जगातील आणि विशेषत: भारतातील अशाच विलक्षण भूवारसा स्थळांची माहीती देण्यात आली आहे. This is a Marathi language book on Geoheritage tourism by Dr Shrikant Karlekar