Jagatik Rajkaran
Marathi
राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावत असताना पारंपरिक व्याप्ती पलीकडे जाऊन, जगात घडणार्या विविध बदलांची नोंद घेऊन, त्यांचा जागतिक राजकारणावर होणारा परिणाम दर्शविणारे मराठीतील विशेष पुस्तक. यामध्ये सैद्धांतिक माहिती बरोबरच विश्लेषणात्मक दृष्टिकोनांचा विचार केला आहे. त्यामुळे पुस्तक अधिक उपयुक्त झाले आहे.
या पुस्तकात जागतिक राजकारणाचा परिचय, त्यासंबंधीचे विविध सिद्धांत, जागतिकीकरणाची वेगवेगळी परिमाणे, राज्याचे बदलते स्वरूप, युद्ध, अण्वस्त्रप्रसार, मानवी हक्क यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास आहे. त्याचबरोबर दहशतवाद, स्थलांतर, पर्यावरण यासारख्या नवीन विषयांचा समावेश केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘कोरोना महामारी’ मुळे जागतिक राजकारणावर होणार्या परिणामांची सर्वंकष माहिती देणारे विस्तृत प्रकरण आणि सर्वात शेवटी भविष्यातील वाटचालीसंबंधी वास्तववादी भूमिका स्वीकारून केलेले विवेचन.
✻