Nivdak Balmitra - Ranjak Katha
Marathi
लहानग्यांच्या विश्वात भा. रा. भागवत हे नाव प्रसिद्ध आहे. ‘फास्टर फेणे’ हा त्यांच्या लेखणीतून उतरलेला खट्याळ पोरगा अजूनही ‘कल्ला’ करतो आहे! पण या फास्टर फेणेच्याही आधी (१९५१ ते १९५७) भा.रां.नी ‘बालमित्र’ नावाचं ‘छोट्या-मोठ्या मुलांचं छानदार मासिक’ चालवलं होतं.
बालमित्रमध्ये काय नाही! विज्ञान, साहस, कविता, थोरामोठ्यांच्या आयुष्यातल्या रंजक गोष्टी... असा सगळा खजिना आहे. पण हा खजिना आजही अजिबात ‘बोअरिंग’ नाही. सिंदबादच्या सफरींसारखा तो उत्सुकतेने जीव मुठीत धरून कधी नवीन गूढ प्रदेशांमध्ये फिरवून आणतो, तर कधी धाडसाने चोर-पोलीस खेळायला लावतो. कधी फजिती करकरू पोट धरून लोळवतो, तर कधी जुन्यापान्या लोककथा सांगून पुंगीवाल्यागत खूळ लावून आपल्यापाठी ओढत घेऊन जातो... आणि मध्येच एखादा चिमटा काढून भानावरही आणतो!
‘बालमित्र’मधल्या या निवडक कथा आणि व्यक्तिचित्रं आजही पोरांना आणि त्यांना वाचून दाखवणार्या थोरांनाही रंगवून टाकतील, याबाबत शंका नाही!
✻