Lokprashasan ani Vittiya Prashasan
२१ व्या शतकात झालेल्या क्रांतिकारी बदलांचा लोकप्रशासन शास्त्र या विषयावर व्यापक प्रभाव पडलेला दिसून येतो. सामाजिक शास्त्रांमध्ये लोकप्रशासन ही महत्वपूर्ण ज्ञानशाखा मानली जाते. या शाखेचा संबंध शासनाशी येतो. शासनासंदर्भातल्या पारंपारिक भूमिकेत आधुनिक काळात अनेक व्यापक बदल झाल्यामुळे लोकप्रशासन शास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना उदयाला आलेल्या आहेत. या नवनवीन संकल्पनांचा विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना परिचय व्हावा या उद्देशाने प्रस्तुत पुस्तकाची रचना केलेली आहे.
प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणांचा समावेश आहे. पहिल्या चार प्रकरणांमध्ये लोकप्रशासन विषयातील मूलभूत संकल्पनांचा आढावा घेतलेला आहे तर उरलेल्या चार प्रकरणात प्रशासनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संरचना, वित्तीय आणि कार्मिक प्रशासनाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकात आवश्यक तेथे मूळ संदर्भांचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक लोकप्रशासन व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.
✻