Mulbhut Samajshastriya Siddhant

Mulbhut Samajshastriya Siddhant
Marathi
0
978-9-386-40189-2
‘समाजशास्त्र’ हा विषय समजून घेण्यासाठी ‘मूलभूत समाजशास्त्रीय सिद्धान्त’ हा ग्रंथ मौलिक ठरेल. प्रस्तुत ग्रंथामध्ये समाजशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि विकास यांबरोबरच समाजशास्त्राच्या मूलभूत संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्त मांडण्यात आले आहेत. आधारभूत तत्त्वे, संकल्पना आणि सिद्धान्त हा कोणत्याही शास्त्राचा पाया असतो. या तीन घटकांमुळे विषयाची व्याप्ती आणि विकास कळण्यासाठी तर मदत होतेच, त्याचपˆमाणे त्या विषयाच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासाठीही मदत होते. एखाद्या विषयाचा अभ्यास करताना सर्वसाधारणपणे ‘संज्ञा’ आणि ‘संकल्पना’ अभ्यासण्यावर लक्ष केंद्रित केले जाते, परंतु सिद्धान्तांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, या ग्रंथात वेगवेगळ्या सिद्धान्तांवरच भर देण्यात आला आहे. या ग्रंथाद्वारे समाजशास्त्राची एकूण पार्श्वभूमी मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जेणेकरून अध्ययन - अध्यापन करणार्या सर्वांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. या ग्रंथाद्वारे सामाजिकीकरण, संस्कृती, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण, सामाजिक परिवर्तन, सामाजिक अनुचलन-विचलन आणि व्यक्तिमत्त्व या आणि अशा आधारभूत तत्त्वांची सैद्धांतिक मांडणी केली आहे.