Adhunik Rajakiya Vicharpranali

Marathi
0
9789386401694
आधुनिक राजकीय विचारप्रणाली' हा विषय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. नेट/सेट, संघ आणि लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यांच्या अभ्यासाक्रमात या विषयाशी निगडित अनेक संकल्पनाचा समावेश आहे. त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयात अध्यापन करणारे अध्यापक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल. सदर पुस्तकात एकूण बारा प्रकरणांचा समावेश आहे. उदारमतवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, लोकशाही-समाजवाद, सर्वंकषवाद इत्यादी पारंपरिक संकल्पनांबरोबरच नव-मार्क्सवाद, बहुसंस्कृतिवाद, समुदायवाद, नागरी समाज आदी आधुनिक आणि नवीनतम संकल्पनांविषयीही या पुस्तकात सविस्तर लेखन केलेलं आहे. पुस्तकात समाविष्ट संकल्पना समजण्यासाठी सुकर व्हाव्यात, म्हणून अनेक उदाहरणांचा समावेश केलेला आहे.