Europatil Arambhichya Vidyapeethancha Uday

Europatil Arambhichya Vidyapeethancha Uday
Marathi
0
978-9-386-40164-9
सालेर्नो, बोलोग्ना आणि पॅरिस ही युरोपातील आरंभीची विद्यापीठे होत. या विद्यापीठांचा उदय नेमका केव्हा झाला हे सांगता येत नाही. या विद्यापीठांना संस्थापक नाही. ही विद्यापीठे उदयास आली आणि वाढत गेली. आरंभी या विद्यापीठांना त्यांच्या स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यांना त्यांची स्वत:ची ग्रंथालये नव्हती आणि प्रयोगशाळाही नव्हत्या! प्राचीन भारतात तक्षशिला, नालंदा ही प्रसिद्ध विश्वविद्यालयेच होती. बाहेरून आलेल्या आक्रमकांनी ती उद्ध्वस्त केली. इ. स. १८५७मध्ये लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर हिंदुस्थानात पहिली तीन विद्यापीठे कोलकाता, मुंबई आणि मद्रास (हल्लीचे चेन्नई) येथे सुरू झाली. हिंदुस्थानातील विद्यापीठ शिक्षणाची परंपरा युरोपात स्थापन झालेल्या आरंभीच्या विद्यापीठांपासून येते; नालंदा, तक्षशिलेकडून नव्हे! लेखक रवींद्र लक्ष्मण लोणकर यांनी सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे येथे ३० वर्षे इतिहास विषयाचे अध्यापन केले. ‘रेनेसॉं’ हा त्यांचा विशेष अध्ययनाचा विषय आहे.