Dasyatun Mukti

Dasyatun Mukti
Marathi
0
978-9-386-40157-1
कृष्णवर्णीय लोकांना शिक्षण मिळण्याच्या हेतूने प्रेरित झालेले बुकर टी. वॉशिंग्टन. व्हर्जिनियाच्या एका गुलाम माता-पित्यांच्या झोपडीत जन्मले आणि कोणाही निग्रो गुलामाची वाताहत व्हावी तशी त्यांचीही झाली. एका गुलाम मजुरापासून ते कृष्णवर्णीयांसाठीचे प्रभावी वक्ते हा त्यांचा प्रवास निश्चितच चढ उतारांनी भरलेला आणि तितकाच भारावून टाकणारा आहे. वॉशिंग्टन यांना शिक्षण मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, प्रवेश परीक्षांचे दिवस, १८८१ मध्ये टस्कीगी संस्थेतील प्रवेश हे सारे प्रसंग ऐतिहासिक दृष्ट्या संस्मरणीय आहेत. वॉशिंग्टन यांचे हे सरळ साध्या भाषेतील आत्मचरित्र अशा अनेक घटनांनी व्यापून आहे. कृष्णवर्णीयांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वॉशिंग्टन आयुष्यभर झटले. त्या अनुभवांचा उहापोह देखील या पुस्तकात आहे. कृष्णवर्णीयांच्या दृष्टीकोनातून शिक्षणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी तर हे आत्मचरित्र वाचायलाच हवे असे आहे.