Bharatiya Arthvyavasthetil Nirnayak Valane
Marathi
पुस्तकात भारतीय आर्थिक इतिहासातील महत्त्वाच्या ५१ निर्णायक बाबींचा विस्ताराने ऊहापोह केला आहे. या बाबी म्हणजे माइलस्टोन म्हणता येतील. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच १९४७ पासून ते २०१७ पर्यंत घडलेल्या काही घटना, शासकीय निर्णय आणि काही अर्थविषयक कायदे यांचा समावेश सदर पुस्तकात आढळतो. विषयांची मांडणी कालानुक्रमाने केली आहे. लेखकाची भाषा सोपी आणि रसाळ असल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.
या पुस्तकाने वित्त विषयातील अभ्यासकांना तसेच सामान्य जिज्ञासूंना या कालावधीतील प्रमुख बाबींचा आढावा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. पुस्तकातील सर्व प्रकरणे वाचकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी मोलाची आहेत.
डॉ. मृणालिनी फडणवीस
कुलगुरू,
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
✻