Asa Mi Ghadalo
कोणत्याही क्षेत्रातील काही लोक ठरवून तर काही अकल्पितपणे त्या-त्या क्षेत्रात आलेले असतात. अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यामध्ये मानवाला नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती या क्षेत्रात कशामुळे आल्या? त्यांना कोणत्या व्यक्तीने, कोणत्या प्रसंगाने या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित केले? सुरवातीला मिळालेल्या छोट्याशा प्रोत्साहनाचे पुढे ‘करियर’ करण्यासाठीच्या ध्येयामध्ये कसे रुपांतर झाले? अशी विविध माहिती देणारे हे पुस्तक आहे. ग्रंथपालन क्षेत्रात ‘करियर’ करण्यासाठी तरुणांना या पुस्तकातील ग्रंथपालांची मनोगतं नक्कीच प्रोत्साहित करतील.
प्रा. राजेंद्र कुंभार
✻