Gujrat 2017 Chitra, Charitra aani charitrya

Gujrat 2017 Chitra, Charitra aani charitrya
Marathi
0
978-9-386-40134-2
गुजरात निवडणुकीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचे मुख्य कारण अर्थातच त्या राजकीय नाटकाचे नायक नरेंद्र मोदी आणि त्यांचे सेनापती अमित शहा. दोघेही अस्सल गुजराती-अगदी २४ कॅरेटचे. मोदी गुजरातमध्ये १२ वर्षे मुख्यमंत्री-२००२ ते २०१४. त्यानंतर साडेतीन वर्षे देशाचे पंतप्रधान. किशोर रक्ताटे आणि राजा कांदळकर जेव्हा गुजरातच्या या चिरेबंदी वाड्यात आले, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात, तेव्हा त्यांना लगेचच दिसू लागले की वाडा तसा चिरेबंदी नाही! कुठे भिंत खचते आहे, खांब कलथूनी जात आहे असे त्यांना दिसू लागले. पण या मोठ्या चिरेबंदी वाड्याची उद्ध्वस्त धर्मशाळा होईल, हेही शक्य नसल्याचे त्यांना जाणवत होते. अखेरीस चिरेबंदी वाडा तसाच उभा राहिला, पण ‘तसाच’ फक्त बाहेरून! कारण भाजपाला १५१ जागा फार दूर राहिल्या, १०० ही जागा जिंकता आल्या नाहीत. कॉंग्रेस ८० च्या कक्षेत पोहोचली. हे सर्व रणकंदन कसे झाले याचा ‘आँखो देखा हाल’ म्हणजे हा वृत्तांतपट!