Visavya Shatakatil Rajkiya Vicharpravah

Marathi
0
9789386401335
जगात विसावे शतक हे क्रांतिकारी शतक मानले जाते. या शतकात ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल झालेले आहेत. या बदलाच्या प्रभावातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्येही अनेक व्यापक बदल झाले. त्यातून विविध राजकीय विचारप्रवाहही विकसित झाले. या शतकातील मार्क्सवाद हा अत्यंत प्रभावी विचारप्रवाह मानला जातो. लेनिन, स्टॅलिन, माओ-त्से-तुंग आणि नव-मार्क्सवादी विचारवंतांनी या विचारप्रवाहाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. दुसर्या महायुद्धानंतर वर्तनवाद, उत्तर-वर्तनवाद, राजकीय सिद्धान्तांचा र्हास, विचारप्रणालींचा अंत असे अनेक विचारप्रवाह विकसित झाले. पुढे जॉन रॉल्सचा सामाजिक न्याय मांडणारा विचार, उत्तर-आधुनिकवाद, दुसर्या महायुद्धात जन्मलेला अस्तित्ववाद, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झालेला स्त्रीवाद आणि पर्यावरणवाद असे विविध विचारप्रवाह ठळक होत गेले. याच विचारप्रवाहांचा व विचारवंतांचा आढावा प्रस्तुत पुस्तकात घेण्यात आला आहे. हे पुस्तक राज्यशास्त्र व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.