Rajyashastrachi Multattve
’राज्यशास्त्राची मूलतत्त्वे’ या पुस्तकांची रचना करताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात आणि स्पर्धा परीक्षेसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगात येईल. या पुस्तकात राज्यशास्त्राची मूलतत्त्वे या विषयाशी निगडित सर्व संकल्पनांचा आढावा घेतलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात प्राचीन आणि आधुनिक राज्यशास्त्राचा परिचय करून दिलेला आहे, दुसर्या प्रकरणात अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय संकल्पनाबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्या राज्याची संघटना, मतदार आणि प्रतिनिधित्व इत्यादी बाबत सविस्तर विश्लेषण केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राज्याच्या कार्याचे वर्णन केलेले आहे. पाचव्या प्रकरणात नागरिकत्व आणि राज्य यांचे संबंध निश्चित करणार्या राष्ट्रीयत्व, राष्ट्र, सार्वभौमत्व, सत्ताविभाजन आणि नागरिकत्व इत्यादीची माहिती दिलेली आहे. सहाव्या प्रकरणात शासनाचे विविध प्रकार आणि लोकशाहीच्या सिद्धांताचा परामर्श घेतलेला आहे. सातव्या प्रकरणात राजकीय व्यवहारांचे स्वरूपाचे विवेचन केलेले आहे. आठव्या प्रकरणात राजकीय विकास, राजकीय आधुनिकीकरण आणि राजकीय पत्रकरिता या आधुनिक संकल्पना संदर्भातील माहिती समाविष्ठ केलेली आहे.
प्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थी वर्गास राज्यशास्त्राची मूलतत्त्वे हा विषय समजण्यास हातभार लागेल तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
✻