Pruthvi Parichay

Marathi
0
9788199120938
‘पृथ्वीपरिचय : भूशास्त्रीय नवसंशोधनांचा मागोवा’ हे प्रामुख्याने भूविज्ञानातील (एरीींह डलळशपलशी) अनेक नवीन संकल्पना आणि संशोधनांचा मागोवा घेणारे पुस्तक आहे. गेल्या काही वर्षात आपल्याला परिचित असलेल्या पृथ्वीची अनेक नवीन रूपे नव्याने झालेल्या संशोधनातून उलगडली आहेत. याचा विचार करून नवीन दृष्टीकोनातून आपल्या पृथ्वीकडे आपण पुन्हा पाहाणे गरजेचे बनले आहे. त्याकरता या पुस्तकातील लेखांचा नक्कीच उपयोग होईल याची खात्री वाटते. वाचकाला प्रत्येक लेखाचा आस्वाद स्वतंत्रपणे घेता यावा व संबंधित लेखातील विषयाची सगळी भूवैज्ञानिक माहिती एकत्रितपणे मिळावी यादृष्टीने पुस्तकातील इतर लेखांत समाविष्ट केलेली काही तांत्रिक माहिती पुन्हा त्या लेखात काही प्रमाणात देणे गरजेचे होते. त्यामुळे अशा माहितीची पुनरावृत्ती काही लेखात आढळून येईल. मात्र वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक वैज्ञानिक माहिती इतरत्र शोधावी लागू नये केवळ याच उद्देशाने अशी रचना केली आहे. पुस्तक अस्वस्थ पृथ्वी, हवामान बदल, हिमावरण, महासागर आणि दुसरी वसुंधरा या पाच भागात विभागले आहे. या पाच विभागात जी नवीन संशोधने झाली आहेत किंवा त्यासंबंधी नवीन विचार मांडण्यात आले असून त्याविषयीचेे लेख समाविष्ट केले आहेत. ही संशोधने ज्यात प्रसिद्ध झाली आहेत त्या संशोधन पत्रिकांची नांवे संदर्भ म्हणून शेवटी दिली आहेत. या सर्व संशोधनातून आपल्याला ज्ञात असलेल्या पृथ्वीचा नव्याने, आणि नवीन दृष्टिकोनातून परिचय होऊ लागला आहे. त्यातून पृथ्वीचे विलक्षण लिष्ट स्वरूप समजणेही सोपे होत आहे. पृथ्वी ग्रहाच्या या मनोवेधक मागोव्याचे वाचक मनापासून स्वागत करतील असा विश्वास आहे. A comprehensive exploration of new geological discoveries, Pruthvīparichay presents fresh insights on Earth’s dynamic nature, climate change, oceans, ice cover, and emerging scientific research.