Marathi Vidnyan Sahitya

Marathi
0
9788199120914
विज्ञान साहित्याचा साक्षेपी आढावा घेणारा हा ग्रंथ आहे. मराठीतील विज्ञान साहित्याचा सवारगांनी मागोवा घेण्याचा प्रयत्न विज्ञान साहित्याच्या अभ्यासकांनी यशस्वीपणे या ग्रंथात केला आहे, हे या ग्रंथाचे वैशिष्टय आहे असे निश्चितपणे म्हणता येईल. विज्ञान साहित्याचा विस्तार होत आहे. अनेक अंगानी ते बहरत आहे याचा प्रत्यय वाचकांना येईल. विज्ञान कथा, कादंबरी. नाट्य, समीक्षा, बाल विज्ञान साहित्य, कविता, विज्ञान संकल्पना, विज्ञान लेखकांची चरित्रे, विज्ञान साहित्याची स्थिती आणि गती, भविष्यातील विज्ञान साहित्य इत्यादी, अशा विविध विषयांवर केलेले सखोल भाष्य वाचकांना दिशा देणारे, अभ्यासकांना अंतर्मुख करायला लावणारे आहे. विद्यार्थी, जिज्ञासू, संशोधक, समीक्षक आणि विज्ञान साहित्याच्या अभ्यासकांना हा ग्रंथ निश्चित उपयोगी ठरेल. प्रस्तुत ग्रंथ मराठी विज्ञान साहित्याचा परीघ विस्तारेल, या प्रवाहा अंतर्गत नवे आयाम दृष्टीपथात येतील,असा सार्थ विश्वास वाटतो ! डॉ. पंडित विद्यासागर विज्ञान लेखक