Adhunik Rajkiya Vishleshan
राज्यशास्त्र या विद्याशाखेची उपशाखा म्हणून आधुनिक राजकीय विश्लेषण हे २०व्या शतकाच्या मध्यांतरानंतर/द्वितीय महायुद्धानंतर/नवस्वतंत्र राष्ट्रांच्या उदयानंतर/युरोपियन साम्राज्याच्या सूर्यास्तानंतर विकसित होऊ लागले. राजकीय सिद्धांत, राजकीय संकल्पना, विचारप्रणालीतील सामाजिक व राजकीय मांडणीतील समस्या दूर करण्यासाठी तत्कालीन अमेरिकन अभ्यासकांनी आधुनिक राजकीय विश्लेषणातून मांडणी सुरू केली.
सदर पुस्तकात राज्यशास्त्राच्या अभ्यासक व संशोधकांसाठी आधुनिक राजकीय विश्लेषणातील विविध संकल्पनांचा समकालीन संदर्भासह विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आधुनिक राजकीय विश्लेषणातील विविध पैलू उलगडणे शक्य होणार आहे. सदर पुस्तकाचे लेखन करताना आधुनिक राजकीय विश्लेषणाची विविध संदर्भग्रंथांतील संदर्भांचा आधार घेतलेला आहे. सदर पुस्तक राज्यशास्त्राच्या अभ्यासक व संशोधकांना निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
✻