Mestar Charles Dochwasaheb Francis
Marathi
शार्ल-द-ओशोवा (मेस्तर चारलस डोचवासाहेब) १८३६ साली म्हणजे वयाच्या २० व्या वर्षी प्रथम भारतास ओझरती भेट देऊन गेला होता. भाषांच्या अभ्यासाची आवड असल्याने भारतीय भाषांचा, साहित्याचा अभ्यास करण्यासाठी १८४३ साली फे्रंच राजदूताचा साहाय्यक म्हणून प्रथम तो मुंबईस आला. महाराष्ट्रात एक वर्ष फिरून अनेकांच्या साहाय्याने त्याने सुमारे १०५० मराठी हस्तलिखिते - बखरी, संतवाणी, वाक्प्रचार, महात्मे, काल्पनिक कथा, देवळांची यादी असे विपुल साहित्य गोळा केले. प्रकृती साथ देत नसल्याने तो १८४४ साली मायदेशी जाण्यास निघाला. पण प्रवासातच तो मरण पावला. मात्र त्याने जमा केलेले सर्व साहित्य फे्रंच सरकारने त्याच्या इच्छेप्रमाणे सुरक्षित ठेवले आहे.
वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्याने केलेल्या वाङ्मयीन कार्याचा येथे परिचय करून दिला आहे. मराठी भाषा, इतिहास, इत्यादींच्या अभ्यासकांना, वाचकांना हे पुस्तक उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरेल अशी उमेद आहे.
✻