Balshikshan : Swaroop aani Navi Disha

Balshikshan : Swaroop aani Navi Disha
Marathi
0
978-8-189-72455-9
मज्जामानसशास्त्रातील घडणार्‍या घटनांकडे जागरूकतेने पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती अशी की, आता लहान मुलाकडे, शिकत असलेल्या शाळकरी मुलाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली आहे. एवढेच नव्हे तर या नव्या दृष्टीतून न्याहाळलेले बालकही आता वेगळे दिसू लागले आहे. आता घरी वा शाळेत आपल्यासमोर उभे राहणारे मूल, हे या सर्व शोधांच्या आधारावर आपण समजून घेतलेले बालक म्हणून आपल्यासमोर उभे राहणार आहे. आपण आजवर मानत आलो तसे अज्ञानाने गृहित धरलेले ते बालक नाही. तर आपल्या अतर्ंगत शक्तींच्या नि आपल्या आजूबाजूच्या आजवरच्या उभ्या राहिलेल्या संस्कृतीच्या आधारे, स्वतःच जगाची ओळख करून घेणारे असे ते मूल आहे. जगातील विविध वस्तू, नि घटनांचे आपल्या पद्धतींनी अर्थ लावणारे, नि त्याचे स्वतःपुरते स्वतंत्र सिद्धान्त बांधणारे असे ते बालक आहे. ते ज्ञाननिर्मिती करणारे शास्त्रज्ञही आहे नि ते तेवढेच प्रभावी असे निर्मितीक्षम कलावंतही आहे.