Bharatiya Va Antarrashtriya Vishesh Din

Marathi
0
9788184836899
संपूर्ण जगभर काही ‘विशेष दिन’ साजरे केले जातात. जसे पर्यावरण दिन, जागतिक लोकसंख्या दिन, वाचन प्रेरणा दिन, मानवी हक्क दिन. अशा विशेष दिनांबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असते. काही विशेष दिन पूर्वापार चालत आलेले असतात. काही राष्ट्रसंघाने घोषित केलेले असतात. असे विशेष दिन राज्य, राष्ट्रीय, जागतिक स्तरावर वर्षभर साजरे केले जातात. हे दिवस विशेष दिन का मानायचे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचे महत्त्व काय? याविषयी आवश्यक असलेली माहिती पुस्तकात अद्ययावत, मुद्देसूद व विस्ताराने दिली आहे. या पुस्तकाचा उपयोग शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता व विविध स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणार्‍या स्पर्धकांना उपयुक्त ठरेल. म्हणून प्रत्येक शाळा व महाविद्यालयात असायलाच हवे असे पुस्तक.