Ladies Gym
Marathi
स्त्रियांना, आरोग्य व फिटनेसचा कानमंत्र देणारं आणि व्यायामाची गोडी लावणारं पुस्तक ! गृहिणी असो वा घर आणि करीअर, अशी कसरत सांभाळणारी आधुनिक स्त्री, सर्वांसाठीच आजच्या धकाधकीच्या युगात रोज नव्यानं उद्भवणार्या आरोग्याच्या समस्या; विविध स्वरूपाच्या व्याधी, चिंतेचा विषय ठरत आहेत आणि त्यांना थोपवायचं तर व्यायामाला पर्याय नाही, हे निश्चित.
या धर्तीवर आरोग्यपूर्ण जगण्यासाठी व्यायामाचं महत्त्व विषद करणारं, डॉ. दिलीप पाखरे यांचं ‘लेडीज जिम’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरतं. लेखकाने यामध्ये जिममधील व्यायामांबरोबरच स्त्रियांना घरच्या घरी, सहजपणे व अगदी कमीतकमी अवधीत करता येणारे अनेक व्यायामप्रकार अतिशय सहजसोप्या शैलीत सांगितले आहेत. तसेच जोडीला डॉक्टर या नात्यानं आरोग्याचा सूचक कानमंत्रही ठीकठिकाणी दिलेला आहे. यामुळे साहजिकच हे पुस्तक केवळ व्यायामप्रकारांची माहिती देऊन थांबत नाही, तर व्यायामाची जाणीव तुमच्यात निर्माण करून ते अवलंबण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करतं.
✻