The Fountainhead

Marathi
0
9788184834963
आयन रँडच्या अस्सल साहित्यिक दृष्टिकोनातून आणि परंपरेला छेद देणार्‍या त्यांच्या व्यक्तिवादी तत्त्वज्ञानातून साकारलेली ‘द फाउंटनहेड’ ही कादंबरी १९४३ साली प्रकाशित झाली तेव्हाच सार्‍या जगभरात तिची भरपूर प्रशंसा झाली. या अजरामर कलाकृतीची कथा आहे- एका तत्त्वनिष्ठ तरुण आर्किटेक्टची. समाजात रूढ असलेल्या प्रमाणांविरुद्धच्या त्याच्या कठोरसंघर्षाची, आणि त्याच्याच प्रेमात असून त्याला रोखण्यासाठी आणि वाचवण्यासाठीही झगडणार्‍या एका सुंदर स्त्रीवरच्या त्याच्या उत्फुल्ल प्रेमाची. आयन रँड (जन्म १९०५, मृत्यू १९८२) १९३६ साली ‘वी द लिव्हिंग’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. १९३८ मध्ये ’ऍन्थम’ प्रकाशित झाली. परंतु, ’द फाउंटनहेड’ (१९४३) आणि ‘ऍटलस श्रग्ड’ (१९५७) या तिच्या दोन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या तेव्हा वाचकांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या. ‘ऑब्जेक्टिव्हिझम’ या तिच्या विलक्षण तत्त्वज्ञानाची जगभरातून दाखल घेण्यात आली. इंग्रजी वाचकवर्गात या कादंबर्‍या अजूनही प्रचंड खपाच्या यादीत आहेत. ‘ऍटलस श्रग्ड’ या कादंबरीचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला मराठी अनुवाद २०११ साली डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केला. त्याला मराठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आता ‘द फाउंटनहेड’ चा अनुवादही त्यांच्याच भाषेत वाचकांच्या भेटीस येत आहे.