Kutumbniyojan karyachi 60 Varshe

Marathi
0
9788184834499
‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन, इंडिया’ ही देशपातळीवर काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने १९४९ ते २००९ या काळात पार पाडलेल्या कार्याची माहिती लेखकाने या पुस्तकात विशद केली आहे. विद्यमान लेखक या संस्थेमध्ये २० वर्षे क्षेत्रीय कार्यक्रम अधिकारी, संचालक (प्रशिक्षण / शाखा व्यवस्थापन) या पदावर कार्यरत होते. कुटुंबनियोजन कार्याबद्दल आस्था असणार्या अभ्यासकांसाठी प्रस्तुत पुस्तक माहितीपूर्ण व उद्बोधक ठरेल. भारतामध्ये गेल्या ६० वर्षांपासून देशपातळीवर कुटुंबनियोजनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कार्याचा प्रसार, प्रबोधन व प्रशिक्षण याची आकडेवारीसहित विस्तृत माहिती या पुस्तकात दिली आहे. कुटुंबनियोजन कार्याच्या अभ्यासकांना ह्या माहितीचा उपयोग नक्कीच करता येईल.