Diamond Bhugol Shabdakosh

Diamond Bhugol Shabdakosh
Marathi
0
978-8-184-83377-5
एक प्रगत व उपयोजित ज्ञानशाखा असलेल्या भूगोल या विषयाच्या सर्व शाखांचा विचार करून या अभिनव अशा कोशाची रचना करण्यात आली आहे. विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून हा कोश सूर्यकूल, पृथ्वी, भूरूपशास्त्र, जलावरण, हवामानशास्त्र, मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल, तंत्रज्ञान, विचारवंत व संशोधक अशा नऊ भागांमध्ये विभागलेला असून अशा स्वरूपाचा हा मराठीतील पहिलाच कोश आहे. कोशातील भूगोल या विषयाच्या संदर्भातील एकूण ३६ परिशिष्टे म्हणजे या कोशाला एक नवे परिमाण प्राप्त करून देणारे वैशिष्ट्य आहे. प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करू पाहणारे विद्यार्थी, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक या सर्वांसाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरेल. याशिवाय मराठीतून स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी व नेट-सेटचे विद्यार्थी यांनाही हा शब्दकोश मार्गदर्शक ठरू शकतो.