Goshtirup Gajanan : Shree Gajanan Vijay pothitil 100 goshti
करता करविता तो आहे असा दृढविश्वास झाल्यावर ‘मी केले’, ‘मी केले’ हा भाव नष्ट होतो. या पुस्तकाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचे उत्तर वरच्या ओवीत आले आहे.
व्यावहारिक अर्थाने एवढेच म्हणता येईल की ज्या देहाकडून दरवर्षी आळंदी-पंढरपूर वारी केली जाते, एकदाच ‘श्री नर्मदा परिक्रमा’ पायी घडली तसेच उल्हासनगर ते शेगाव ही पायी वारी केली गेली त्या देहाकडून हे लिखाण झाले, इतकेच.
का झाले असावे हे लिखाण या प्रश्नाच्या उत्तराला महत्त्व आहे. श्री गजानन- महाराजांचे चरित्र ओवीबद्ध. ‘पोथी’ हेच स्वरूप. लाल, केशरी कापडात गुंडाळून ठेवावयाचा ग्रंथ. हजारो साधक, शेकडोवेळा पारायण करीत असले तरी ग्रंथ मर्यादित गटाच्या लोकांच्या हातात. ज्यांना ‘पोथी’ वाचावयाची नाही अथवा तसे वाचन करण्याचा कंटाळा, त्यांना ‘श्री गजाजन महाराजांच्या’ लीला कशा कळाव्या ?
सहज, सोप्या, छोट्या-छोट्या कथा. कोणतीही कथा केव्हाही वाचा. अनुक्रमाचे बंधन नाही, मात्र ते बंधन पाळल्यास सलग १-१०० गोष्टी वाचत गेलात तर पारायण केल्याचे समाधान हमखास मिळणार हे निश्चित. असा दुहेरी लाभ.
Marathi langiuage book on 100 stories from the life of Shree Gajanan Maharaj.
✻