Adhunik Marathi Sahitya

Adhunik Marathi Sahitya
Marathi
0
978-8-184-83306-5
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या TYBA -2021 मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमासाठी शिफारस झालेले पुस्तक. आधुनिक मराठी साहित्याच्या अनुषंगाने ग्रंथपरीक्षण, ललितगद्य आणि प्रवासवर्णन या वाङ्मय प्रकारांची तात्त्विक ओळख, त्या-त्या वाङ्मय प्रकारांशी संबंधित कलाकृतींचे अंतरंग प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रंथपरीक्षण तसेच ललितगद्य आणि प्रवासवर्णन या वाङ्मय प्रकाराशी संबंधित विविध अभ्यासकांनी केलेले अभ्यासपूर्ण लेखन या ग्रंथाचे सामर्थ्य आहे. वाङ्मयप्रकाराच्या तात्त्विक अंगाबरोबरच विशिष्ट कलाकृतींचा समीक्षेच्या अंगाने घेतलेला वेध ग्रंथाच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकेल, याची खात्री वाटते. असंख्य वाचक, विद्यार्थी आणि अध्यापकांना हा ग्रंथ दिशादर्शक ठरावा अशी अपेक्षा...!