Maharashtratil Panth
या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात परस्परांना छेद देणारी कोणतीही विधाने न करता महाराष्ट्रातील संप्रदायांचे स्वरूप अतिशय समतोलपणे स्पष्ट केले आहे. यामागे त्यांची सुस्पष्ट, तर्कसंगत विचारसरणी व अभ्यासाची निकोप दृष्टी प्रत्ययास येते. अत्यंत नि:संदिग्ध स्वरूपात विषयाची मांडणी केली असल्याने सामान्य वाचकास या विषयाचा परिचय करून घेणे आनंददायी होईल. नाहीतर उलट-सुलट विधानांमुळे सामान्य वाचकाचा वैचारिक गोंधळ होणे शक्य असते. त्यामुळे हे काम वरवर पाहता साधे वाटले तरी ते तितके सोपे नसते हे निश्चित. लेखकाने अत्यंत यशस्वीपणे हा विषय हाताळलेला आहे. Marathi book about different religious sects in Maharashtra.
✻