Vyavasthapanachi Tatve Ani Karye

Marathi
0
9788184831818
आधुनिक काळात सर्व व्यवसाय, संस्था, उद्योगधंदे, व्यापार तसेच विविध स्तरांवर व्यवस्थापनाची गरज भासते. त्यामुळे व्यवस्थापनाची मूलतत्त्वे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतसे व्यवसाय व्यवस्थापनामध्ये अमूलाग्र बदल घडून आलेले दिसत आहेत. हे बदल त्या त्या वेळच्या व्यवसाय पद्धतीवर अवलंबून आहेत. जगामधील तांत्रिक प्रगतीचा उद्योगधंद्यांवर झालेला परिणाम दिसून येतो. तसेच उद्योगधंद्यांच्या पर्यावरणामध्येही खूप बदल दिसून येतो. या गोष्टींचा परिणाम म्हणून व्यवस्थापनांची कार्ये, तत्त्वे आणि निर्माण झालेले नवीन स्त्रोत सर्वांना अभ्यासणे अनिवार्य आहे. सदर पुस्तकात व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, घटक, विविध कार्ये, व्यवस्थापनातील विचारवंतांचे मौलिक योगदान तसेच आधुनिक व्यवस्थापनाचे विचार प्रवाह या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. व्यवस्थापनाच्या अभ्यासकास या पुस्तकाचा उपयोग होईल. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 'व्यवस्थापनाची तत्वे आणि कार्ये' विषयासाठी उपयुक्त पुस्तक.