Jansampark

Marathi
0
9788184831788
जनसंपर्क ही एक महत्त्वाची विद्याशाखा म्हणून आज मान्यताप्राप्त झाली आहे. संवादाचे महत्त्व अनादि काळापासून समाजाने मान्य केले आहे. परस्परांशी संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी विविध प्रकारे संवाद साधला जातो. संवाद हा अर्थपूर्ण आणि एकमेकांना सहकार्य करणारा हवा. गोंधळ, द्वेष, शत्रुत्व या भावना निर्माण होऊ नयेत म्हणून संवाद हा योग्य पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध झाला पाहिजे. विशेष करून व्यावसायिक संस्था व त्यांचे ग्राहक आणि हितसंबंधी यांच्यातील संवाद, शासन आणि नागरिक किंवा सार्वजनिक संस्था व त्यांचे हितसंबंधी यांच्यात संवाद एकदिलाने व्हावा, याकरिता योग्य जनसंपर्काची आवश्यकता असते. जनसंपर्क साधताना कोणती काळजी घ्यावी, याची मूलतत्त्वे व त्यामागील मार्गदर्शक भूमिका याविषयीचे विश्‍लेषण जनसंपर्क शास्त्राच्या माध्यमातून केले जाते. सदर पुस्तक म्हणजे या विषयाची ओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे.