Maharashtrache Shilpkar

Maharashtrache Shilpkar
Marathi
0
978-8-184-83175-7
महाराष्ट्राचा इतिहास तसा जुना. पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा. अभिमानाने सांगण्यासारखा. हा महाराष्ट्र देश शिवाजीराजांचा देश आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास अशा शेकडो संतांचा आहे. टिळक, आगरकर, सावरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशा सुधारकांचाही आहे आणि चिवट, काटक, बळकट आणि स्वाभिमानी मराठी माणसांचा आहे. महाराष्ट्राच्या वैभवाची अशी महापूजा आजच्या घडीलाही अनेकांकडून बांधली जात आहे. या साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या दारी बांधलेले भावफुलांचे तोरण कधी सुकत नाही, कोमेजत नाही. त्याचा तजेला जन्मोजन्मी टिकावा असे वैभव घेऊन आला आहे. डॉ. सरोजिनी बाबर यांनी बांधलेले हे तोरण आजही याची साक्ष देते.