Bharatiya Samaj Prashna Ani Samasya
भारतीय समाजातील विविध समाजिक प्रश्नांची समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उकल करणारे उपयुक्त पुस्तक. समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उपयुक्त.
जेव्हा समाजाचा विकास होतो तेव्हा काही प्रमाणात त्या समाजातील समस्याही वाढत असतात. बरेचदा जे लोक समस्याग्रस्त असतात त्यांच्या समस्या वेगळ्या असतात व जे समस्याग्रस्त नसतात त्यांच्या समस्याग्रस्तांबद्दलच्या समस्या वेगळ्या असतात. समाजशास्त्रात या दोन्हीही दृष्टिकोनांचा विचार होणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे मानवी शरीरात रोग उत्पन्न होणे स्वाभाविक आहे, त्याप्रमाणे मानवी समाजात समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे. समस्या लपवून ठेवणे हे कोणत्याही समाजासाठी भूषणावह नाही. समाजशास्त्राच्या अभ्यासकाला व विद्यार्थ्याला समाजात उपस्थित असलेला कोणताही विषय वर्ज्य नाही. जे जे समाजात घडते ते ते सगळे त्याच्या अभ्यासाचाच भाग आहे. या अर्थाने समाजशास्त्राची प्रयोगशाळा प्रत्यक्ष समाजच आहे.
✻