Vyavasaay Vyyavasthapan
आधुनिक व्यापार-उदीम, स्थल-काल निरपेक्ष आणि परस्परानुवर्ती बनला आहे. त्यातून जागतिक उद्योग (Global Industries) उदयाला येत आहेत. हे उद्योग म्हणजे उद्योगाच्या विविध अवस्थांची, विविध देशांचा हातभार असलेली उत्पादन शृंखला ! एका देशाची संकल्पना, दुसर्याचे डिझाईन, तिसर्या देशात सुटे भाग बनवणे, अन्य अनेक ठिकाणी उत्पादने ! असे उद्योग परस्पराशी स्पर्धा देखील करतात ! व्यापाराची ही सहज प्रवृत्ती आहे. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान,उपग्रहीय दळणवळण, लोकांचे आंतर- सांस्कृतिक अभिसरण इ. मुळे जागतिकीकरणाचा रेटा प्रचंड वाढला आहे. नवा जागतिक ग्राहक (Global Consumer) उदयास येत आहे. ई.कॉमर्स तंत्रामुळे व्यवहारपूर्ततेच्या भौगोलिक मर्यादा कोलमडून पडल्या आहेत.
केवळ ‘दुसर्या देशात मालाचा खप’ म्हणजे आंतरराष्ट्रीय विपणन नव्हे ! उद्याचे एक व्यवसाय प्रारुप (Business model) म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. ‘विपणन म्हणजेच व्यवसाय’ असे मानले तर आंतरराष्ट्रीय विपणन सततची ‘व्यवसाय गुंफण आणि वृद्धी’ होय !
✻