Mahabharat

Marathi
0
9788184830996
महाभारत हे महर्षी व्यासांनी रचलेले महाकाव्य आहे. या जगात शतकानुशतके जे जे घडले आहे, जे जे घडत आहे, ते सर्व महाभारतात आहे असे म्हटले जाते. महाभारत हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. महाभारतात अनेक व्यक्ती असल्या तरी कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण हे महाभारताच्या केंद्रस्थानी आहेत. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाभारतात सतत घटना घडतात, जय पराजय होतात, पण अंतिम विजय सत्याचा म्हणजे पांडवांचा होतो. भगवान श्रीकृष्णांनी रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली गीता हा महाभारतकथेचा मेरुमणी आहे. भारतातील प्रत्येकाशी महाभारत निगडित आहे. हरिकथेने नटलेले हे महाभारत वाचकांना कल्याणदायी होवो.