Diamond Manasshastra Shabdkosh

Marathi
0
9788184830835
मानसशास्त्र विषयाच्या जिज्ञासूंमध्ये मराठी माध्यमाचा अवलंब करणार्‍या अभ्यासकांचा वर्ग पुष्कळच वाढलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवीपूर्व, पदवीचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांना शिकविणारा अध्यापकवर्ग, मराठीतून विषय-संशोधन करणारे, स्पर्धा परीक्षांमध्ये मातृभाषेतून परीक्षा देणारे, आंतरशाखीय अभ्यास करणारे, इंग्रजीतील मानसशास्त्रीय साहित्याचा अनुवाद करू पाहणारे अनुवादक आणि अगदी दैनंदिन व्यवहारात मानसशास्त्रीय लिखाणाचे वाचन करणारे साधारण वाचक या सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. मूळ इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ व उच्चार, इंग्लिशमधील व्याख्यांसह. १५०० हून संज्ञांचा तसेच शब्दसमूहांचा समावेश. चार विशेष परिशिष्टांचा समावेश. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी. संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.