Granthalay Va Mahitishastra Kosh

Marathi
0
9788184830781
डायमंडचा ‘‘ग्रंथालय व माहितीशास्त्र कोश’’ हा मराठीतील पहिला आणि एकमेव कोश. ग्रंथालय व माहितीशास्त्र ही ज्ञानशाखा अलीकडेच विकसित झालेली आहे. पाश्चात्य भाषांमध्ये यासंबंधी विपुल साहित्य आढळते. पण मराठीत आता कुठे या ज्ञानशाखेतील साहित्य बाळसे धरू लागले आहे. म्हणून कोशनिर्मितीची ही कामगिरी महत्त्वाची. यामध्ये ग्रंथालयांचा इतिहास, तालिकीकरण, वर्गीकरण, संदर्भसेवा, प्रलेखन या विषयांतील पारंपरिक संकल्पना तर आहेतच, त्याचबरोबर मागणी प्रमाणे मुद्रण, मेटाडेटा, माहिती आधारभूत संच, माहितीची विविध रूपे, माहितीची प्रतिप्राप्ती, माहितीचे लेखा परिक्षण, सिक्स सिग्मा यासारख्या नवीन नवीन संकल्पनाही स्पष्ट केल्या आहेत. नवनवे संदर्भ आणि जुन्या जाणकारांचे कार्य यांचे एकत्रीकरण ! मुळातच ग्रंथालय व माहितीशास्त्र ही ज्ञानशाखा आंतरशाखीय. माहितीशास्त्र हे नवे शास्त्र. त्यामुळे इतर सर्व ज्ञानशाखांतील संकल्पनांचे एकत्रीकरण या कोशात येणे स्वाभाविकच ! ग्रंथालय व माहितीशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक, अध्यापक व नवागत व्यावसायिकांना, जिज्ञासूंना उपयोगी पडणारा कोश. विषयनिष्ठ कोशवाङ्मयातील एक अनमोल भेट.