Shaikshanik Margdarshan va Samupdeshan

Marathi
0
9788184830514
शैक्षणिक मार्गदर्शन जोन्स यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड-निवड, पात्रता, समायोजनक्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील साहाय्य. ’’ ब्रेवर यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले साहाय्य. ’’ रुथ स्ट्रँग यांच्या मते, ‘‘अभ्याक्रम (अध्ययनयोग्य) निवडण्यास व त्यातील प्रगतीसाठी मदत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र.’’ समुपदेशन : ‘सल्ला- मसलत’ म्हणजे समुपदेशन. मार्गदर्शनात समस्यांच्या स्वरूपानुसार समुपदेशन करावे लागते. जसे - विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, आरोग्य, कौटुंबिक, अभ्यासविषयक व समायोजनसमस्या. समुपदेशनाचे कार्य : विद्यार्थ्यांच्या प्रगतीआड येणार्‍या समस्यांची जाणीव करून देणे. बलस्थाने, कुवत, पात्रता यांची जाणीव करून देणे. आत्मविश्‍वास निर्माण करणे. शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावरील अत्यंत मुद्देसूद सखोल व अभ्यासपूर्ण पुस्तक.