Bharatatil Mahila Vikasachi Vatchal
स्त्रीवर होणार्या बलात्कार, अत्याचार, अवहेलना, अपमान ह्या सार्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ते संपूर्णंपणे निर्मूलन होईल, थांबेल अशी आशा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. शासनातर्फे वेळोवेळी होणारे प्रतिबंधक कायदे, जनसामान्य स्त्री पुरुषांचे सातत्याने प्रबोधन, प्रसारमाध्यमांचा दबाव व त्यांच्यामार्फत होणारे जनजागरण व वातावरणनिर्मिती ह्या सर्वांचा सामूहिक परिणाम म्हणजे त्या प्रमाणात होणारी घट. ह्या सर्व अत्याचार, अन्यायापासून मुक्त असा समाज निर्माण करणे हे दूरवरचे उद्दिष्ट आहे. अंतिम ध्येय आहे. त्यासाठीच शासन, जनसामान्य, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था ह्यांची बांधिलकी निर्माण होणे अगत्याचे आहे. भारतीय राज्यघटनेची उद्दिष्टे ही पायाभूत आहेत. समता स्वातंत्र्य,बंधुता ह्या मूल्यांसाठीच भारतातील महिला विकासाची वाटचाल चालू आहे.
महिला विकासाच्या आगामी वाटचालीत पुरुषवर्गाच्या समंजसतेची, उदार मनोवृत्तीची नितांत आवश्यकता आहे. स्त्रीमुक्तीची कार्यप्रेरणा हे पुरुषविरोधी, पुरूषाला शत्रू मानणारे असणार नाही कारण महिला मुक्तीबरोबरच पुरुषमुक्तीही होणार आहे. कौटुंबिक जीवन सुखी समाधानी, सुसंकृत होण्यासाठी पुरुषवर्गात सुयोग्य बदल, परिवर्तन वेगाने व्हायला हवा. पुरुषसत्ता, स्वामित्वभावना अधिकाधिक मवाळ, सहयोगी पूरक व्हायला हवी. आगामी काळातील महिला विकासाची वाटचाल प्रामुख्याने पुरुषवर्गाच्या वृत्ती-प्रवृत्ती परिवर्तनावर अवलंबून आहे.
अशा महिला विकासातील सर्व महत्त्वाच्या टप्प्यांचे दर्शन या पुस्तकातून होते.
✻