Jwaljwalantejas Sambhajiraja

Marathi
0
9788184830477
महाराष्ट्राच्या जागृतीची पहाट श्रीशिवरायांच्या अद्भुत कर्तृत्वातून अवतरली आणि स्वराज्याचा महन्मंगल अरुणोदय झाला. त्यानंतरची छत्रपती शंभूराजांची सारी नऊ वर्षांची कारकीर्द; पण अशी विलक्षण की कल्पित कथेलाही फिकी ठरवील. मानवी जीवनाचे एवढे उत्कट, अचाट आणि रोमांचकारी दर्शन इतिहासाने क्वचितच घेतले असावे. ‘राजेश्री आबासाहेबांचें जें संकल्पित तेंच करणें आम्हांस अगत्य,’ हे त्यांच्या छत्रपतित्वाच्या अनुष्ठानाचे सूत्र होते आणि आपल्या जीवनाची आहुती देईपर्यंत ते त्यापासून कधीही ढळले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या अतुल्य बलिदानानंतरच्या अभूतपूर्व परिस्थितीत महाराष्ट्र असा काही खवळून उठला की, त्या अंगारात औरंगजेबाच्या बादशाहीची निम्म्याहून अधिक वर्षे होरपळून निघाली. महाराष्ट्राच्या जिवाची घालमेल शंभूराजांच्या कालखंडात एकसारखी वाढत गेली आणि अखेर तो रुद्र कोपला. मनाला गलबलवून टाकणार्‍या त्या कालावधीतील अनेक गुंतागुंतीच्या आणि अज्ञात घटनांचे पदर उलगडून सांगणार्‍या शंभूराजांच्या ह्या चरित्राइतके साधार, विस्तृत आणि समतोल भूमिकेने लिहिलेले दुसरे चरित्र नाही, असा निर्वाळा महाराष्ट्राच्या इतिहाससमीक्षकांनी एकमुखाने दिला आहे.