Arthik Vichar va vicharwant
या पुस्तकात अर्थशास्त्रीय विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ यांच्या आर्थिक विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थशास्त्रीय विचारांच्या इतिहासाचे स्वरूप व महत्त्व, व्यापारवाद, निसर्गवाद यांचे तपशीलवार विवेचन केले आहे. ऍडम स्मिथ, माल्थस, रिकार्डो, जे. बी. से., सिसमॉंडी, लिस्ट, महंमद युनुस, कार्ल मार्क्स, मार्शल इत्यादींच्या विविध संकल्पना, विचार, सिद्धान्त यांचे स्पष्टीकरण केले आहे. तसेच भारतीय आर्थिक विचारवंतांपैकी कौटिल्य, महात्मा फुले, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, राजर्षी शाहूमहाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनजंयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, अमर्त्य सेन इत्यादींचा समावेश केला आहे.
अर्थशास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी या ग्रंथाचे स्वागतच करतील अशी खात्री वाटते.
✻